क्राईम डायरीमुख्य बातम्या

“नाइट वॉक’ बेतला जीवावर!; दारूड्याने मोटारसायकल घातली अंगावर!!; दवाखान्यात येऊन म्‍हणाला, माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही, बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रात्री फिरायला बाहेर पडलेल्या वृद्ध महिलेला दारूड्या मोटारसायकलस्वाराने उडवले. त्‍यांच्‍या पतीने तातडीने त्‍यांना डॉ. निरखे यांच्‍या रुग्‍णालयात दाखल केले. सध्या त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुलडाणा शहरातील सागवन भागातील शांतिनिकेतननगरात २८ जुलैच्‍या रात्री पावणेनऊच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी आज, ३१ जुलैला तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी मोटारसायकलस्‍वाराविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

गोविंद प्रल्हाद बेंडाळे (६१) हे न्‍यायालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते पत्नी सिंधू (६३) यांच्‍यासोबत जेवण झाल्यानंतर फिरायला गेले. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असताना चिंतामणी ढवळे हा तरुण दुचाकीने भरधाव आला. अचानक त्याचा गाडीवरचा ताबा सुटून रस्त्याच्या विरुध्द बाजूला येऊन सिंधूबाईंना धडक दिली. त्‍यामुळे सिंधूबाई श्रीमती बोरले यांच्या गेटसमोर पडल्‍या. रहिवाशांनी दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्‍न केला, मात्र तो दारूच्या नशेतच तिथून लगेच पसार झाला.

सिंधूबाईंना दवाखान्यात नेण्यात आले. त्‍यांच्‍या कंबरेला इजा होऊन कंबरेचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. यातून कायमस्वरुपी अपंगत्व येण्याचीही शक्‍यता आहे. दुसऱ्या चिंतामणी हा डाॅ. निरखे यांच्‍या दवाखान्यात आला आणि या दाम्‍पत्‍याला धमकावले. तुम्हाला जे करायचे ते करा, मी कुणालाही घाबरत नाही, माझे वरपर्यंत संबंध असल्यामुळे माझे कुणीही वाकडे करू शकत नाही, असे धमकावून तो निघून गेला. आज गोविंद बेंडाळे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार दिली. तपास महिला पोलीस हेड कॉन्‍स्‍टेबल श्रीमती तोमर करत आहेत.

जांब बसथांब्‍यावरही तरुणाला उडवले
विलास दिलीप खंडाळे (२८) हा जांब बसथांब्‍यावर उभा असताना त्‍याला मोहोऱ्याकडून भरधाव येणाऱ्या मोटासायकलस्वाराने (MH 21AL 8421) ने धडक दिली. यात विलास गंभीर जखमी झाला. त्‍याची प्रकृती गंभीर असून, तो चालत, बोलत नाही एकाच जागी झोपलेला आहे. तपास पोहेकाँ सुभाष वर्मा करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: