क्राईम डायरीमुख्य बातम्या

नाईट वॉक करणाऱ्या शिक्षकासह एकाला मोटारसायकलने उडवले; दोन जखमी

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नाईट वॉकसाठी बाहेर पडलेल्या दोन मित्रांना मोटारसायकलने धडक दिली. यात मोटारसायकलस्वारासह एक जण जखमी झाला. ही घटना निमगाव येथे जळगाव जामोद रस्‍त्‍यावर 15 जूनच्‍या रात्री साडेदहाच्‍या सुमारास घडली.

न्यू इरा हायस्कूलमध्ये शिक्षक असलेले सुहास गोपालराव वाघमारे (43, रा. निमगाव ता. नांदुरा) हे त्‍यांचे मित्र अनंत दत्तु नागपुरे यांच्‍यासह जेवण केल्यानंतर नाईट वॉक करत होते. मंगेश विठ्ठल अवचार (रा. निमगाव) याने त्याच्‍या ताब्यातील मोटारसायकल (क्र. एमएच 28 पी 5287) भरधाव व निष्काळजीपणे चालवून या दोघांना धडक दिली. तो स्‍वतःही मोटारसायकलसह रस्‍त्‍यावर पडला व जखमी झाला. वाघमारे यांच्‍या डाव्या पायाच्या गुडघ्याला मुक्का मार लागला. उजव्या हाताच्या बोटाला मार लागला. त्‍यांनी मोटारसायकलचे हॅन्डल पकडले व मंगेशला “तुला दिसले नाही का’ असे विचारले. त्यावर मंगेश दारू पिलेला असल्याने काही बोलला नाही, असे तक्रारीत वाघमारे यांनी म्‍हटले आहे. तपास सहायक फौजदार श्री. इंगळे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: