क्राईम डायरी

नादी लागला तर एखाद्या दिवशी उडवून देईल… युवकाला धमकी!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मी सीआरपीएफचा जवान आहे. नादी लागला तर एखाद्या दिवशी उडवून देईल, अशी धमकी देऊन युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना नांदुरा तालुक्यातील अमलपूर येथे 17 मे रोजी सकाळी 11 वाजता घडली.

या प्रकरणात विठ्ठल भानुदास बागडे (32, रा. अमलपूर) याने रघुनाथ उल्हास घाईट (32) याच्‍याविरुद्ध तक्रार दिली आहे. विठ्ठलची अमलपूर बसथांब्‍यावर पानटपरी आहे. रघुनाथ त्‍याला नेहमी शिविगाळ करून त्रास देतो. 17 मे रोजी सकाळी 11 वाजता थांब्‍यावर येऊन त्‍याने विठ्ठलला शिविगाळ केली. तेवढ्यावरच न थांबता चापट बुक्‍क्यांनी मारहाण केली. नांदुरा पोलिसांनी रघुनाथविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास पो. काँ. प्रभाकर देवचे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: