क्राईम डायरीमुख्य बातम्या

नापिकी, कर्जबाजारीपणाचा बळी!; देऊळगाव मही येथील शेतकऱ्याने घेतला गळफास

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कर्जबाजारीपणासह सततच्‍या नापिकीला कंटाळून 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, 8 एप्रिलला दुपारी 3 च्या सुमारास देउळगाव मही येथे उघडकीस आली. समाधान पिराजी झिने (35, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

दिग्रस रोडवर साई पार्कच्या बाजूला झिने यांची शेती आहे. या शेतातीलच निंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतला. ही बाब तेथील अन्य शेजारी शेतकऱ्यांच्या लक्षात येतात पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. झिने यांच्याकडे 4 एकर कोरडवाहू शेती होती. सततची नापिकी, खासगी सावकार तर बँकांचे कर्ज त्यांच्‍यावर होते. परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते शेतीसोबतच मिस्तरी काम सुद्धा करायचे. झिने यांच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: