क्राईम डायरीमुख्य बातम्या

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले!; मोताळा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मोताळा तालुक्यातील कोल्हीगवळी येथे आज, 8 मार्चला सकाळी समोर आली.

अमोल जयराम बोराळे (रा. कोल्हीगवळी, ता. मोताळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्‍याच्याकडे 4 एकर शेती आहे. मात्र सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्‍याने रात्रीतून राहत्या घरात गळफास घेतला. अमोल यांच्या पश्चात पत्‍नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: