महाराष्ट्र

नितीन गडकरींना सीएम ठाकरेंच्‍या “अशाही’ शुभेच्‍छा!

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍याकडे भावी पंतप्रधान म्‍हणून पाहिले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्‍यांना आतापासून शुभेच्‍छा दिल्या आहेत. कर्तृत्वाने तुम्‍ही ओळख देशभरात निर्माण करत असून, पुढची वाटचालही याच गतीने होवो, अशा शुभेच्‍छा त्‍यांनी दिल्या.
नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज, ३१ जुलैला श्री. गडकरींच्‍या हस्ते झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावत भाषणही केले. त्‍यांनी गडकरींचे भरभरून कौतुक केले. युतीच्‍या सत्ताकाळातील आठवणीही जागवल्या.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: