बुलडाणा (घाटावर)

नियम मोडला… देऊळगाव राजात 205 वाहनधारकांवर कारवाई!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध देऊळगाव राजा येथे गेल्या चार दिवसांत मोहीम उघडण्यात आली होती. यात 205 वाहनचालकांकडून 27 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यात विना मास्‍क, विना नंबर प्लेट तसेच गाडीची कागदपत्रे नसणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. कागदपत्रे नसल्यामुळे 13 दुचाकी जप्त करण्यात आल्‍या आहेत. यापैकी 11 वाहनचालकांनी कागदपत्रे आणून दिल्या मुळे त्यांच्या गाड्या  परत करण्यात आल्या. अशीच कारवाई पुढील काही दिवस पोलीस व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरात राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: