बुलडाणा (घाटावर)

न्यायालयीन कर्मचारी धाव धाव धावले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा न्यायालयाच्या अधिनस्थ असलेल्या वि. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मोताळा व वि. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चिखली येथील कार्यरत असलेले कर्मचारी बेलीफ गजानन पाटील व कनिष्ठ लिपीक सुरेश शिंबरे यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने “न्यायालयीन कर्मचारी धावतो देशाकरिता”च्या माध्यमातून 22 कि.मी ची दौड केली. या दौडमधून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दौडला चिखली येथे वि. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, चिखली यांनी सकाळी हिरवी झेंडी दिली.

या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हा न्यायालय, बुलडाणा प्रबंधक व्ही. आर भारंबे यांच्‍या स्फूर्तीने ही दौड केली. न्यायालयीन कर्मचारी दौडसाठी चिखली येथून सकाळी 5.10 वाजता निघून 7.15 वा जिल्हा न्यायालय, बुलडाणा येथे पोहोचले. दौड दरम्यान लक्ष्मीकांत सपकाळ, मोताळा यांनी त्यांना पायलट म्हणून मदत केली. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात वि. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी धावपटू कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे उपस्थित होते. दौडदरम्यान प्रत्येक 5 ते 7 कि.मी च्या अंतरावर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून श्री. पाटील व श्री. शिंबरे यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक व्ही. आर भारंबे, डी. एल सपकाळ, प्रदीप शिंदे, मंगेश चोपडा यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close