देश-विदेश

पंतप्रधान मोदींवरील टीका महागात; तरुणाची रवानगी तुरुंगात

ढाका : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संबंधीत टीकाकारास तुरुंगावारी करावी लागल्याच्या घटना देशात याआधी घडल्या आहेत.परंतु शेजारी बांगला देशातील एका तरुणालाही पंतप्रधान मोदींवरील टीका महागात पडली असून त्यासाठी त्याला चक्क तुरुंगात जावे लागले आहे. या तरुणाविरोधात ‘डिजिटल सिक्युरिटी अ‍ॅक्ट‘अंतर्गत गुन्हा नोंदवल्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी हे महिनाअखेरीस बांगला देशच्या दौर्‍यावर जाणार असून बांगला देशच्या सुवर्णमहोत्सवी स्थापनदिन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या या दौर्‍यास विरोध करत उत्तर पश्चिम बांगला देशातील ठाकूरगाव जिल्ह्यातील बलियाडांगी येथील एका तरुणाने सोशल मीडियात चार मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला. त्यात त्याने भारताचे पंतप्रधान मोदी यांच्या बांगला देश दौर्‍याला विरोध केला आहे. मोदी तसेच बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना तसेच परराष्ट्र मंत्र्यांवर आपल्या व्हिडीओत जोरदार टीका केली आहे.मोदींनी आपल्या देशात पाय ठेवावेत, असे आपल्याला वाटत नाही, असे सांगतानाच त्याने तिन्ही नेत्यांवर तीव्र टीका व चित्रविचित्र कॉमेंट केल्या आहेत.त्यामुळे पोलिसांनी पकडून त्याची रवानगी तुरंगात केली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: