क्राईम डायरीमुख्य बातम्या

पती-पत्‍नी और वो… मी तिला सोडून दिलेय, तू नांदायला ये… तिने येऊन पाहिले तर बसला धक्‍का!; दोघे राहत होते पत्‍नी-पत्‍नीसारखे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मी तिच्‍यासोबतचे संबंध तोडले आहेत. तू घरी नांदायला ये. आपण सोबत राहू… असे म्‍हणून पत्‍नीला त्‍याने बोलावले. पण जेव्‍हा खरंच पत्‍नी घरी आले तेव्‍हा तिला धक्‍काच बसला. संबंध तर तोडलेच नव्‍हते पण दोघे पती-पत्‍नीसारखे राहत होते. उलट मी त्‍याची बायको आहे, तुला आता काहीही संबंध नाही असे म्‍हणून तिनेच विवाहितेला लोटून दिले. ही घटना सारोळा मारोती (ता. मोताळा) येथे 30 जूनच्‍या सायंकाळी सहाच्‍या सुमारास घडली.

सौ. रुपाली सत्यानंद नखोद (37, रा. सारोळा मारोती, ह. मु. बुलडाणा) या विवाहितेने या प्रकरणात दिलेल्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी तिचा पती सत्यानंद कडू नखोद व त्‍याची प्रेयसी यांच्‍यासह कडू रामकृष्ण नखोद, ताईबाई कडू नखोद, ज्ञानेश्वर भानुदास घड्याळे (सर्व रा.सारोळा मारोती) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. मूलबाळ होत नसल्याने आणि पतीचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याने त्‍यांच्यात वाद सुरू होते. मात्र घटनेच्‍या दिवशी पतीने तिला विश्वास देत घरी बोलावले होते. त्‍यामुळे ती भावासह सासरी आली. मात्र तिला पती व त्‍याची प्रेयसी नवरा- बायकोसारखे संसार करताना आढळले.

तिने त्‍याच्‍या प्रेयसीला विचारणा केली असता तिने तिला लोटून दिले. मी त्याची बायको आहे. तुझा काहीही संबंध नाही, असे ती म्‍हणाली. पती व सासरच्या अन्य मंडळींनी तिला पकडून ठेवले. पतीच्‍या प्रेयसीने तिच्‍या डोक्‍यात लाकडी काठीने डोक्यावर मारून जखमी केले. विवाहितेचा भाऊ भांडण सोडविण्यास आला असता त्‍यालाही लाथाबुक्‍क्यांनी मारहाण करण्यात आली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी पती, त्‍याची प्रेयसी व अन्य सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. तपास बिट अंमलदार पोहेकाँ सुरेश सोनवने करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: