क्राईम डायरीमुख्य बातम्या

पत्नीच्या भेटीआधीच काळाचा घाला!; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नीला आणायला सासरवाडीला निघालेल्या युवकाचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, 26 जानेवारीला सकाळी 9 वाजता रोहडा फाट्याजवळ (ता. चिखली) समोर आली.
अनिल भावलाल छरे (25, रा. जवळखेड रोहिदास वाडी, ता. देऊळगाव राजा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. अनिल नाशिकला बिगारी कामगार होता. काल रात्री 9 वाजता तो शेलगाव जहागीर येथे सासरवाडीला जाण्यासाठी दुचाकीने निघाला होता. रोहडा फाट्याजवळीत पाटात दुचाकीसह पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रात्री अंधार असल्याने आणि तो रस्त्याच्या बाजूला असल्याने हा प्रकार सकाळी उघडकीस आला. अनिलचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. घटना कळताच अंढेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: