क्राईम डायरीमुख्य बातम्या

पत्‍नी, साल्यावर विळ्याचे सपासप वार!; पतीला रात्रीच अटक, मुलीचे लग्‍न होऊ द्यायचे असेल तर 5 लाख द्या म्‍हणत होता…!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः पत्‍नी, मुलगी व साल्यावर विळ्याने सपासप वार करून पती पळून गेला. यात पत्‍नीची प्रकृती गंभीर असून, तिच्‍यावर जिल्हा सामान्य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुलडाणा शहरातील परदेशीपुरा वॉर्ड क्रमांक 2 मध्ये काल, 25 मे रोजी रात्री उशिरा 11 च्‍या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीने बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी रात्रीच हल्लेखोर पतीला ताब्‍यात घेतले. त्‍याला आज, 26 मे रोजी न्‍यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेख अमिन शेख असगर (40) असे हल्लेखोराचे नाव असून, त्‍याची पत्‍नी हनिफाबानो शेख अमिन, मुलगी तबसुमबानो शेख अमिन, साला सलीमखान हसनखान पठाण (रा. झोपडपट्टी, भादोला) जखमी झाले आहेत. शेख अमीनला तीन मुली आहेत. तो पत्‍नी व मुलींसह परदेशीपुऱ्यात राहतो. त्‍याच्‍या तरन्नुमबानो शेख अमिन (19) या मुलीचे लग्‍न ठरले असून, लग्‍न होऊ द्यायचे असेल तर मला 5 लाख रुपये द्या, अशी मागणी तो पत्‍नी व साल्याकडे करत होता. यातून अनेकदा पती-पत्‍नीत वाद होत. काल रात्रीही वाद झाला. त्‍यातून त्‍याने विळ्याने पत्‍नी हनिफाबानो हिच्‍यावर सपासप वार केले. सलीम खान तिला वाचवण्यासाठी धावला असता त्‍याच्‍यावरही वार केले. मुलगी तबसुमबानोने विळा पकडण्याचा प्रयत्‍न केला असता तिच्‍याही करंगळीला मार लागून ती जखमी झाली आहे. पत्‍नी व साला रक्‍ताच्‍या थोराळ्यात गंभीर जखमी होऊन पडल्‍याचे पाहून शेख अमीन तिथून पळून गेला.

मुलींनी आरडाओरड केल्याने रजियाबी हसनखान (आजी), हसन खान सलमान खान पठाण ( आजोबा) व अन्य लोकांनी धावून येत जखमींना जिल्हा सामान्य रुग्‍णालयात हलवले. या प्रकरणी तरन्नुमबानोने बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी शेख अमीनविरुद्ध गुन्‍हा दाखल करत त्‍याला रात्रीच अटक केली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: