बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पलढग धरणात आता जलपर्यटन! दोन इंजिन बोटी पर्यटकांच्या सेवेत

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 26 जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यातील पलढग धरणाच्या जलाशयात दोन इंजिन बोटींचे केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.


पर्यटन विकास योजने अंतर्गत ज्ञानगंगा अभयारण्याच्या सर्वांगीण विकासासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून तारापूरजवळील पलढग धरणाच्या क्षेत्रामध्ये वनपर्यटकांसाठी 52 लक्ष रुपयांच्या दोन इंजिन बोटींचे लोकार्पण करण्यात आले. तसेच वन-पर्यटकांसाठी महिला बचत गट अंतर्गत उपहारगृहाचे सुध्दा उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रातील बांधवांशी संवादही साधला. कार्यक्रमासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधवराव जाधव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती चे मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी, ज्ञानगंगा अभयारण्य प्रकल्पाचे डी.सी.एफ. श्री. खैरनार, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, तारापूरचे संरपच प्रविण जाधव, योगेश जाधव, डॉ. गोपाल डिके, राहूल सोळंके, प्रविण निमकरडे, बाळू जाधव आदींसह वनपरिक्षेत्र अभयारण्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: