जिल्ह्याचं राजकारण

पाच वर्षे निष्क्रीय कारभाराचे बळी ठरलेले धोत्रा भनगोजी पुन्हा भूमिपूत्र ग्रामविकास पॅनलला देणार साथ!

धोत्रा भनगोजी (मन्सूर शाह) ः गावात विकासकामे करूनही गेल्या पंचवार्षिकमध्ये ग्रामस्थांची दिशाभूल करून विरोधकांनी सत्ता काबीज केली. पण पाच वर्षांत सत्ताधार्‍यांनी काय केलं, हे ग्रामस्थांना कळून चुकलंय. निष्क्रीय कारभारामुळे गावातील विकासकामे ठप्प झाली, ज्या योजना आधीच्या सत्ताधार्‍यांनी मंजूर करून आणल्या त्या सुद्धा तशाच ठप्प ठेवण्यात आल्या. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा भूमिपूत्र ग्रामविकास पॅनलला सत्तेत आणण्याचा निर्धार केला असून, त्याशिवाय गावाचा विकास अशक्य असल्याचे त्यांना उमजले आहे.

ग्रामविकास पॅनलचे नेतृत्त्व माजी सरपंच बळीराम सदाशिव काळे यांच्याकडे आहे. राजकारण-समाजकारणातील मुरब्बी व्यक्तीमत्त्व, गावात विकासकामे कशी आणायची अन् ती कशी पूर्ण करत राबवायची याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी आपल्या सत्ताकाळात अनेक योजना मंजूर करून आणल्या. त्याद्वारे गावात जो काही विकास घडला तो घडला, पण गेल्या पाच वर्षांत सत्ताधार्‍यांनी या योजना पुढे नेल्या नाहीत. नवीन योजनाही आणल्या नाहीत. गावातील रस्ते भकास करून ठेवले, नाल्यांचे बांधकाम नाही, सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने जिकडे तिकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गावात कायम रोगराई पसरण्याचा धोका असतो. गावात घरकुलाचा प्रश्‍न असो की सामान्यांची अडली नडली कामे सत्ताधार्‍यांपेक्षा गावकर्‍यांना बळीराम काळे यांचाच आधार वाटत आलाय. गेली 5 वर्षे सत्तेत नसूनही त्यांनी ग्रामस्थांना कधीच अंतर दिले नाही. कुणीही त्यांच्याकडे या, हक्काने मदत मागा असा शिरस्ता गेली पाच वर्षे चालत आला आहे. दुसरीकडे सत्ताधार्‍यांनी मात्र खुर्ची उबवण्यापलिकडे काही केले नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थांची आहे. आम्ही संधी देऊन पाहिली पण त्यांनी केवळ स्वतःचे खिसे भरण्यापलिकडे काही केले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यांना विकाससकामे करायची नव्हती तर कशासाठी निवडणूक लढली आणि आमची दिशाभूल केली, अशा भावना आता ग्रामस्थ व्यक्त करतात आणि आता गेल्यावेळची चूक होऊ देणार नाही. भूमिपूत्र ग्रामविकास पॅनललाच साथ देणार, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

हे हात घडवणार धोत्रा भनगोजीचा विकास…

धोत्रा भनगोजी गावाची लोकसंख्या 3500 आहे. या गावात भूमिपूत्र ग्रामविकास पॅनलचे एकूण 9 उमेदवार उभे आहेत. सर्वच उमेदवार चांगले शिक्षित, विकासाची जाण असलेले, समाज कार्याची आवड असलेले आहेत. गावाला स्मार्ट व्हिलेज करण्याचे स्वप्न हे उमेदवार बाळगून आहेत.

  • वॉर्ड क्रमांक 1 ः मदन बळीराम काळे (निशाणी बस), सौ. पूजा विष्णू भुसारी (निशाणी कपबशी), सौ. वर्षा परसराम सोनारे (निशाणी नारळ)
  • वॉर्ड क्रमांक 2 ः विश्‍वंभर भगवान हळदे (निशाणी छत्री), मीरा संदीप उन्हाळे (निशाणी बस), उषा अशोक शिंदे (निशाणी नारळ)
  • वॉर्ड क्रमांक 3 ः प्रसाद संभाजी काळे (निशाणी नारळ), सौ. रेश्मा गजानन देशमुख (निशाणी शिट्टी), सौ. यशोद गणेश कुसळकर (निशाणी बस)

गावाचा विकास पाटोदाच्या धर्तीवर करणार

1963 पासून राजकारणात असलेले बळीराम काळे यांच्याशी बुलडाणा लाइव्हने संवाद साधला. भूमिपूत्र ग्रामविकास पॅनलची वाटचाल कशी राहील, गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ते काय करणार, याबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की गावात आजघडीला अनेक समस्या आहेत. रस्ते, नाल्या, पाणी, घरकुल, वीज या समस्यांमुळे ग्रामस्थ हैराण आहेत. आमच्या काळात आम्ही आणलेल्या योजना सत्ताधार्‍यांनी पुढे नेल्या नाहीत. अन्यथा गावात आज विकासाची गंगा वाहिली असती. अनेक ग्रामस्थांनी आम्हाला गेल्या वेळची झालेली चूक बोलून दाखवली. पण मी कधी त्यामुळे कुणाला अंतर दिले नाही. आलेल्या प्रत्येकाची मदत करत गेलो. यावेळी पुन्हा सत्ता ताब्यात दिली तर गावाचा विकास औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावाच्या धर्तीवर करणार आहे. त्या गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी ज्या पद्धतीने गावाला स्मार्ट विलेज केले अगदीच त्याच धर्तीवर धोत्रा भनगोजीचा विकास घडविण्याचा मानस आहे. निवडून आल्यावर नवे सदस्य पाटोदा गावाचा दौरा करून येतील, तेथे कशापद्धतीने काम चालते, विकासासाठी नव्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आणि तो कशा पद्धतीने घेतला याचा अभ्यास सदस्य करतील आणि अगदीच तशाच पद्धतीने गावाचा विकास साधतील. गेल्या 5 वर्षांत सत्ताधार्‍यांनी काय केलं, हे गावाच्या समोर आहे. त्यामुळे भूमिपूत्र ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना सर्वच ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळतोय ही समाधानी बाब आहे. ग्रामस्थांचा विश्‍वास आम्ही तोडणार नाही. जे जे वचन दिले आहे, त्या वचनांची पूर्ती निवडून आल्यानंतर अवघ्या काही दिवसांनंतर दिसायला सुरुवात होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: