क्राईम डायरीमुख्य बातम्या

पाणी पिण्यासाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्‍यू; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पाणी पिण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. ही घटना भरोसा (ता. चिखली) येथे आज, 24 एप्रिल रोजी पहाटे समोर आली. संतोष बापूराव जाधव (28, रा. भरोसा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

संतोष शेळीपालन करून उदरनिर्वाह करत होता. तो गतिमंद असल्याने पत्‍नीही त्याच्‍यासोबत राहत नव्हती. काल, 23 एप्रिल रोजी तो नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी भरोसा शिवारात गेला होता. त्यावेळी तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी तो जवळच असलेल्या गोकुळ ओंकार जोहरे यांच्या विहिरीवर गेला. मात्र विहिरीचे बांधकाम झालेले नसल्याने पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी त्याच्या बकऱ्या घरी पोहोचल्या. मात्र संतोष घरी न पोहचल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. अखेर आज पहाटे त्याचा मृतदेहच पाण्यावर तरंगताना दिसून आला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: