बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पुढील 5-6 दिवस जिल्ह्यावर पावसाचे सावट

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक उन्‍हाळा जाणवत असताना पावसाचे सावटही जिल्ह्यावर असून, 30 एप्रिल ते 2 मेपर्यंत सोसाट्याच्‍या वाऱ्यासह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

समुद्रातून येणारे बाष्प, हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे सध्या दक्षिण भारतासह पूर्व आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तीन दिवसांपासून पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.  हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यांनुसार ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. या तीनही विभागांत हलका पाऊस मात्र कायम राहणार आहे. विदर्भातील तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांच्याही पुढे गेला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: