कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पुन्हा उसळी: पॉझिटिव्ह साडेआठशेच्या घरात! तिघांचा मृत्यू, एकूण बळींचा आकडा तीनशेपार!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : सलग 3 दिवस  कमी रुग्णसंख्येचा फसवा दिलासा देणाऱ्या कोरोनाने आज, 10 एप्रिलला तब्बल 845 कोरोना पॉझिटिव्हचा आकडा गाठत प्रशासन व आरोग्य यंत्रणांना हादरविले! यात बुलडाणा तालुक्याचा ( 265 रुग्‍ण ) धक्का गंभीर असल्याचे चित्र आहे. यातच अन्य 6 तालुक्यांतील उद्रेक धककदायक व धोकादायक असल्याने कोरोनाचे आव्हान अधिकच कडवे झाले आहे.

जिल्ह्यात अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आल्यावर  मागील 3 दिवसांत रुग्ण संख्या कमी झाल्याचे सुखद चित्र होते. 7 एप्रिलला 626, 8 एप्रिलला 606 तर 9 एप्रिलला 619 अशी बाधितची संख्या होती. यामुळे केंद्रीय पथकाच्या आगमनाने अगोदरच धास्तवलेल्या आरोग्य यंत्रणा सुखावल्या असतानाच कोरोनाने विकेंडला पुन्हा उसळी मारली. परिणामी गत्‌ 24 तासांत पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या 845 वर पोहोचली!  यात बुलडाणा तालुक्याने 265 चा वाटा उचलला. याशिवाय खामगाव 82, देऊळगाव राजा 59, चिखली 64, मेहकर 88, मलकापूर 73, लोणार 58 या तालुक्यांची भर धोक्याची घंटा वाजविणारी ठरली. संग्रामपूर  (2 रुग्ण) वगळता  अन्य तालुके खूपच मागे आहेत असेही नाहीये! नांदुरा 37, शेगाव 31, जळगाव जामोद 31, मोताळा 29, सिंदखेडराजा 26 या तालुक्यांतून कोरोना हटला असे नाही हे स्पष्ट होते.

बळींची संख्या तीनशेच्या पार

दरम्यान गत 24 तासांत तिघा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील 2 तर खामगाव सामान्य रुग्णालयातील एका रुग्णाचा यात समावेश आहे. यामुळे आजवरच्या बळींची संख्या 302 वर गेली आहे. आजघडीला 5768 रुग्ण उपचार घेत आहेत.  रुग्ण वाढल्याने पॉझिटिव्हीचा दर 14.58 टक्के पर्यंत पोहोचला आहे. यामुळे कोरोना जिल्ह्याला तसूभरही दिलासा द्यायला तयार नसल्‍याचे दिसून येते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: