पुन्‍हा विकृती… उकिरड्यावर फेकले दोन दिवसांचे अर्भक!; सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उकिरड्यावर स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने पिंपरखेड बुद्रूक (ता. सिंदखेड राजा) गावात खळबळ उडाली आहे. किनगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या बाळाच्या आईचा शोध घेतला जात आहे. सोनोशीचे पोलीस पाटील परमेश्वर विठ्ठलराव सोळुंके (41) यांनी किनगाव राजा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पिंपरखेड बुद्रूक येथील आतिशकुमार रामराव …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उकिरड्यावर स्‍त्री जातीचे अर्भक आढळल्‍याने पिंपरखेड बुद्रूक (ता. सिंदखेड राजा) गावात खळबळ उडाली आहे. किनगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, त्‍या बाळाच्‍या आईचा शोध घेतला जात आहे.

सोनोशीचे पोलीस पाटील परमेश्वर विठ्ठलराव सोळुंके (41) यांनी किनगाव राजा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पिंपरखेड बुद्रूक येथील आतिशकुमार रामराव राठोड यांनी त्‍यांना फोनवर माहिती दिली की गावात उकिरड्यावर अर्भक पडलेले आहे. त्‍यानंतर पोलीस पाटलांनी पिंपरखेड बुद्रूक गाठले. संतोष चव्हाण यांच्या घराच्या बाजूला असलेल्या उकिरड्यावर स्त्री जातीचे वय अंदाजे एक ते दोन दिवसांचे अर्भक दिसून आले. घटनेची माहिती किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांना दिली. श्री. पवार यांनी पथकासह पिंपरखेड गाठले. अर्भकाची कोणतीही अवहेलना न होता ते ताब्‍यात उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेड राजा ग्रामीण रुग्‍णालयात पाठविण्यात आले.