क्राईम डायरी

पुलावर दुचाकीचा अपघात, युवक गंभीर जखमी; नांदुरा शहरातील दुर्घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरातील बुलडाणा रोडवरील लाकडी पुलावर दुचाकी अपघातात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 10 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी नामदेव आत्माराम नेमाडे (35) हे त्यांच्या दुचाकीने (क्र. एमएच 28 बीजे 2307) जात असताना अचानक लाकडी पुलाजवळ त्याच्या दुचाकीला अपघात होऊन ते रोडवर पडले. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकार, प्रविण डवगे, दिलीप इंगळे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमीस उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: