बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पेशंट कमी; ५ जण दगावले! बुलडाण्यात कोरोना स्फोट; २ तालुक्यांना कोरोनाचा तडाखा

बुलडाणा( विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः शुक्रवारच्या तुलनेत आज, १५ मे रोजी जिल्ह्यात कमी कोरोना पेशंट असले तरी बुलडाणा तालुक्यात कोविडचा प्रकोप झाल्यासारखे चित्र असून, आणखी दोन तालुक्यांना शतकीय तडाखा बसल्याचे दिसून आले. दुसरीकडे पाच जण उपचारादरम्यान दगावले आहेत.

काल जिल्ह्यात बाराशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आज जिल्ह्यात ८७८ बाधित निघालेत. आघाडीवरील बुलडाणा तालुक्यात स्फोट झाल्यासारखी स्थिती असून, २४ तासांत तब्बल २१२ रुग्ण आलेत. याशिवाय शेगाव  ११० मलकापूर, १३९ देऊळगाव राजा,८४ लोणार ७५, नांदुरा ७५, मोताळा ५१, खामगाव ४१ या तालुक्यातील चित्र गंभीरच आहे. या तुलनेत चिखली ३२, मेहकर २१, सिंदखेराजा ३४, संग्रामपूर व जळगाव जामोद  प्रत्‍येकी ११ अशे कमी रुग्ण आहेत. दुसरीकडे गत्‌ 24 तासांत ५ रुग्‍ण दगावले आहेत. उपचारादरम्यान मोहना (ता. मेहकर) येथील 51 वर्षीय पुरुष, निमगाव (ता. नांदुरा) येथील 83 वर्षीय पुरुष, पलसोडा (ता. नांदुरा) येथील 60 वर्षीय महिला, मेहकर येथील 45 वर्षीय महिला, वाकूड (ता. खामगाव) येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

3924 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4802 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3924 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 878 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 720 व रॅपीड टेस्टमधील 158 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 2874 तर रॅपिड टेस्टमधील 1050 अहवालांचा समावेश आहे.

764 रुग्णांचा डिस्‍चार्ज

आज 764 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 411081 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 70700 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2855 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 77044 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 5838 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 506 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: