क्राईम डायरीमुख्य बातम्या

पैशासाठी माणुसकी सोडणार्‍या दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल

शेगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीला बंदी असतानाही विक्रीसाठी ठेवणार्‍या दोन दुकानदारांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी आज, 13 जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद जहीर शेख जमीर (45, रा. डगडाळीपुरा, शेगाव) व आनंद श्रीधर शेगोकार (40, रा. दसरानगर, शेगाव) अशी या दुकानदारांची नावे आहेत. दुपारी या दोघांच्याही दुकानावर छापा मारण्यात आला असता नायलॉन मांजा विक्रीसाठी त्यांनी ठेवल्याचे दिसून आले. नायलॉन मांजामुळे लहान मुले, वाहनधारक, पादचारी अडकून अपघात होण्याची शक्यता असते. नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना दुखापत होते. हे माहीत असूनसुद्धा या दुकानदारांनी चायनीज नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवला. दोन्ही दुकानदारांविरुद्ध पो. ना. उमेश दयाराम बोरसे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. दंदे करत आहेत. मोहम्मद याच्याकडून 400 रुपयांचा तर आनंद याच्याकडून 375 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: