क्राईम डायरीमुख्य बातम्या

पोलीस ठाण्यासमोरच अपघात; शिवजयंतीच्या बंदोबस्तासाठी जाताना होमगार्डचा मृत्यू; रायपूर पोलीस ठाण्यासमोरील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिवजयंतीच्या बंदोबस्तासाठी जाताना कुत्रा आडवा आल्याने अपघातात होऊन जखमी झालेल्या होमगार्डचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रायपूर (ता. चिखली) येथे काल, 18 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता घडली. विश्वनाथ किसन झगरे (45, रा. रायपूर) असे मृत्‍यू झालेल्या होमगार्डचे नाव आहे.
विश्वनाथ झगरे व रवींद्र युवराजसिंह देशमुख (49) हे दोघे काल दुपारी 4 वाजता दुचाकीने रायपूर पोलीस ठाण्यात चालले होते. पोलीस ठाण्यासमोरच दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने दोघेही दुचाकीवरून पडले व गंभीर जखमी झाले. रायपूर पोलिसांनी दोघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्‍यान झगरे यांचा मृत्यू झाला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: