बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

पोल्‍ट्री फार्ममधील शंभर कोंबड्या अचानक दगावल्या!; शेतकरी हैराण, देऊळगाव राजा तालुक्‍यातील प्रकार

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या तीन दिवसांत शंभरावर कोंबड्या दगावल्याने डोईफोडे वाडी (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकरी राजेंद्र डोईफोडे हैराण आहेत.

डोईफोडे यांचे पोल्‍ट्री फार्म असून, त्‍यात २०० कोंबड्या होत्‍या. पैकी १०० कोंबड्यांनी तीन दिवसांत माना टाकल्या. त्‍यांनी तातडीने ही माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. झांबरे यांना दिली. त्‍यांनी पोल्‍ट्री फार्मला भेट दिली. कोंबड्याची उत्तरीय तपासणी करून अहवाल आल्यावरच मृत्‍यूचे कारण समोर येईल, असे ते म्‍हणाले. या घटनेमुळे पोल्‍ट्री फार्मचालकांत खळबळ उडाली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्‍हणून पोल्‍ट्री फार्म सुरू केलेल्या डोईफोड यांच्‍यावर मोठेच आर्थिक संकट आले असून, शासनाने त्‍यांना मदत करावी, अशी मागणी ग्रामस्‍थ करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: