क्राईम डायरीमुख्य बातम्या

प्रवासी बसविण्याच्‍या कारणावरून ऑटोचालकाचा खून!; खामगावमधील थरारक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ऑटोत प्रवासी बसविण्याच्‍या कारणावरून झालेल्या वादात एका ऑटोचालकाने दुसऱ्या ऑटोचालकाचा खून केला. ही घटना आज, 1 एप्रिल रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास खामगाव शहरातील निर्मल टर्निंगवर घडली. अजय विनायक आवटे (45, रा . सती फैल, खामगाव)  असे खून झालेल्याचे नाव आहे, तर त्‍याच्‍या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मेहरसिंग गोविंदसिंग चव्हाण ऊर्फ पिंचू  (रा. लक्कडगंज ,खामगाव) याला ताब्‍यात घेतले आहे.

प्रत्‍यक्षदर्शींच्‍या माहितीनुसार, ऑटोत प्रवासी बसविण्यावरून अजय आणि मेहरसिंगमध्ये वाद झाला. २ तास दोघांत धुसफूस सुरू होती. वादाचे रूपांतर हाणामारी झाले. यातून मेहरसिंगने कृपाण शस्‍त्र थेट अजयच्‍या पोटात खुपसले. अजय रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडला. त्‍याला अन्य नागरिक आणि रिक्षाचालकांनी तातडीने सरकारी रुग्‍णालयात आणले. मात्र आणतानाच त्‍याचा मृत्‍यू झाला होता. घटनेनंतर मेहरसिंग स्‍वतः पोलिसांसमोर जाऊन हजर झाला. अधिक तपास शिवाजीनगर व खामगाव शहर पोलीस करत आहेत. सुरक्षेच्‍या कारणास्‍तव निर्मल टर्निंगवर पोलीस बंदोबस्‍त लावण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: