क्राईम डायरीमुख्य बातम्या

प्रेमाचे जाळे… 22 वर्षीय तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जवानाने केला बलात्‍कार; बुलडाण्यातील धक्‍कादायक घटना, लग्‍नाचे आमिष दाखवले, साखरपुडा दुसऱ्याच मुलीशी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 22 वर्षीय तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेत लग्‍नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्‍यावर बलात्‍कार करण्यात आला. या प्रकरणी तरुणीच्‍या तक्रारीवरून सैन्यात जवान असलेल्या केसापूर (ता. बुलडाणा) येथील रामेश्वर भास्‍कर चव्हाण याच्‍याविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. रामेश्वरचा साखरपुडा झाला असून, तो दुसऱ्या मुलीशी लग्‍नाच्‍या तयारीत असतानाच पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. त्‍यामुळे त्‍याचे बिंग फुटले आणि आता आज, 16 एप्रिलला होणारे लग्‍नही मोडले आहे.

बुलडाणा शहरातील एकतानगर परिसरात पीडित तरुणी आपली विधवा आई, बहीण व भावासह राहते. ती शहरातील एका महाविद्यालयात बीएच्‍या प्रथम वर्षाला शिकते. ती पोलीस भरतीची तयारी गेल्या दोन वर्षांपासून करत आहे. जिजामाता कॉलेजच्‍या ग्राऊंडवर ती तयारीसाठी जात होती. तिथे आर्मीतील एका जवानाशी तिची ओळख झाली. या जवानाचा रामेश्वर चव्हाण मित्र आहे. या जवानाच्‍या माध्यमातून तिचीही ओळख रामेश्वरशी झाली. रामेश्वरने तिचा मोबाइल क्रमांक घेऊन तिला फोन केला. यातूनच ओळख वाढून व्‍हॉट्‌स ॲप चॅटिंग होऊन दोघे एकमेकांच्‍या प्रेमात पडले. तो तिला नेहमी लग्‍नाचे आमिष दाखवत होता. 31 ऑक्‍टोबर 2020 रोजी रामेश्वर सुटीवर आला होता. त्‍या दिवशी दुपारी 2 च्‍या सुमारास तो तिला जिजामाता कॉलेजच्‍या ग्राऊंडवर भेटला. त्‍याने तिला राजूर घाटातील बालाजी मंदिरात जाऊ असे सांगून दुचाकीवर बसवले. बालाजी मंदिरातून त्‍याने तिला मोताळा रस्‍त्‍याने वाघजाळ फाट्याच्‍या समोरील रोडने एका शेतात नेले. शेतात त्‍याने तिला शरीरसंबंधाबद्दल विचारले. तिने नकार दिला. तरीही त्‍याने इच्‍छा नसताना बलात्‍कार केला. त्‍यानंतर बुलडाणा येथे तिला घराजवळ आणून सोडले. त्‍यानंतर रोज दोघे फोनवर बोलत होते. 2 नोव्‍हेंबर 2020 रोजी सकाळी 11 च्‍या सुमारास तो पुन्‍हा बुलडाणा येथे आला. पीडितेच्‍या घराजवळून तिला मोटारसायकलवर बसवून चिखली रोडने एसबीआयच्‍या सुंदरखेड शाखेसमोरील एका बाईच्‍या पत्राच्‍या घरात नेले. तिथे बोलण्यासाठी दुसऱ्या खोलीत नेऊन पुन्‍हा तिची इच्‍छा नसतानाही बलात्‍कार केला. त्‍यानंतर घराजवळ आणून सोडले. त्‍यानंतर सुटी संपल्याने तो ड्युटीवर निघून गेला. यानंतरही दोघे फोनद्वारे एकमेकांच्‍या संपर्कात होते. जम्मू येथे सैन्यात तो नोकरीला असल्याचे व्हॉट्‌स ॲप चॅटिंगवरून तिला कळले होते. यानंतर या महिन्यात 3 एप्रिल 2021 रोजी रामेश्वर पुन्‍हा सुटीवर आला. जम्मूवरून भुसावळला पोहोचल्यावर त्‍याने तिला मलकापूरला भेटण्यास बोलावले. ती त्‍याला भेटण्यास गेली असता मलकापूर बसस्‍थानकाजवळील लक्ष्मी लॉजवर त्‍याने तिला नेले. त्‍याने तिथे रूम घेताना तिचे नाव कोमल पवार सांगितल्‍याचे पीडितेने तक्रारीत म्‍हटले आहे. रूममध्ये पुन्‍हा लग्‍नाचे आमिष दाखवून त्‍याने तिच्‍यावर बलात्‍कार केला. तिथे 2 वाजेपर्यंत दोघे थांबले होते. बसने बुलडाणा येथे दोघे परत आले.

असे फुटले बिंग…
मलकापूरहून बुलडाण्याला परत येत असतानाच रामेश्वरला घरून फोन आला. त्‍यावरून पीडितेला कळाले की त्‍याचा दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा झाला आहे. त्‍याचे त्‍या मुलीसोबत 8 एप्रिलला लग्‍नही ठरले होते. मात्र मुलीचा काका वारल्याने लग्‍न पुढे ढकलण्यात आले. याबाबत तिने रामेश्वरला विचारणा केली असता त्‍याने टाळाटाळ केली. त्‍यामुळे पीडितेने त्‍याची सविस्‍तर माहिती काढली असता त्‍याने लग्‍न आज 16 एप्रिलला असल्याचे तिला समजले. हे लग्‍नही आता तुटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस रामेश्वरला ताब्‍यात घेण्यासाठी केसापूरला गेले होते, पण तिथे तो मिळून आला नसल्याचे समजते.
पीडितेची पोलीस ठाण्यात धाव…
लग्‍नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्‍ती शरीरसंबंध ठेवणाऱ्या रामेश्वरविरोधात पीडितेने बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी रामेश्वरविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहिरराव करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: