क्राईम डायरीमुख्य बातम्या

प्लॉट परस्पर विकले; महिलेला दीड कोटीचा गंडा; खामगावच्या प्रसिद्ध व्यक्तीविरुद्ध झाला गुन्हा दाखल

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीच्या नावावरील प्लॉट बनावट कागदपत्रे तयार करत परस्पर विकून महिलेला तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार खामगावमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप प्रेमसुखदास राठी याच्याविरुद्ध आज, 25 जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे.
अंजू लवकेश सोनी (रा. सराफा गल्ली, खामगाव) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून, त्यांच्या पतीने हे प्लॉट घेऊन ठेवले होते. त्यांच्या पतीच्या निधनानंतर अंजू या गृहिणी असल्याने त्यांना कळणार नाही या हेतूने राठी याने 2007 ते 2020 दरम्यान हे प्लॉट बनावट कागदपत्रे घरीच तयार करून हडपल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस निरिक्षक सुनील अंबूलकर करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: