जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

फक्त साहेबच! सिंदखेड राजा तालुक्यात घड्याळाचे काटे जोरात!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात साहेबांचा आदरयुक्त दरारा कायम असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निकालातून समोर आले आहे.

सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगावमही, साखरखेर्डा, शेंदुर्जन, किनगावराजा, दुसरबीड, खळेगाव, पिंप्री खंदारे, बीबी, हत्ता या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचायतींसह अनेक गावांत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्याने जिल्ह्याचे नेते पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेसाहेब यांचे सिंदखेडराजा मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे अधोरेखित झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींचे निकाल आज लागले. मतदारांनी प्रस्थापितांना नाकारून नव्या चेहर्‍यांना संधी दिल्याचे बहुतांश ग्रामपंचायतीच्या निकालातून दिसून येत आहे. नगर पालिका टाऊन हॉलमध्ये सकाळी नऊला मतमोजणीला सुरुवात झाली. साखरखेर्डा व दुसरबीड या दोन ग्रामपंचायती तालुक्यात सर्वांत मोठ्या असून, साखरखेर्ड्यात शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलला एक जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलला 16 जागा मिळाल्या. दुसरबीड येथे 17 जागांपैकी एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. उरलेल्या 16 पैकी 12 जागी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली. दुसरबीड विकास आघाडीच्या पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. आंबेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. दुसरबीडमध्ये ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पती पंडितराव खंदारे, पंचायत समिती सभापती पती विलासराव देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. निवडणूक निकालादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत असून, आता निवडणूक संपली आहे. निवडणुकीच्या कारणावरून कोणीही आपसात वाद करून गावाचं वातावरण खराब करू नये. आता फक्त गावाच्या विकासाचा विचार करावा.

– डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: