क्राईम डायरीमुख्य बातम्या

फार्मसीचे शिक्षण घेणारी 24 वर्षीय युवती गायब; देऊळगाव घुबे येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फार्मसीचे शिक्षण घेणारी 24 वर्षीय युवती गायब झाल्याची घटना देऊळगाव घुबे येथे समोर आली आहे. प्रणिता नंदकिशोर गोरे असे या युवतीचे नाव आहे. याप्रकरणी युवतीच्या वडिलांनी काल, 5 जानेवारीला रोजी ती हरवल्याची तक्रार दिली आहे.
प्रणिता 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेली. गोरा रंग, साडेपाच फूट उंची, सडपातळ बांधा, अंगात गुलाबी टॉप घातलेल्या प्राणितीचा नातेवाईकांकडे तसेच तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला परंतु ती मिळुन न आल्याने प्रणिताचे वडील नंदकिशोर गोरे यांनी मुलगी हरवल्याची तक्रार दिली. अशा वर्णनाची मुलगी आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन अंढेरा पोलिसांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: