बुलडाणा (घाटावर)

फी भरण्यासाठी इंग्रजी शाळांकडून पालकांची छळवणूक, लोणारमध्ये भाजपाची तक्रार

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सक्‍तीने फी वसूल करणाऱ्या इंग्रजी शाळांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

लोणारमधील इंग्रजी माध्यमाच्‍या शाळा पालकांकडून सक्‍तीने फी वसूल करत आहेत. फी भरा अन्यथा तुमच्‍या मुला-मुलीचा प्रवेश घेतला जाणार नाही, असे धमकावले जात आहे. त्‍यामुळे पालक चिंतित झाले आहेत. लॉकडाऊनमुळे आधीच पालकवर्ग हवालदील आहे. व्यवयाय, कामधंद्यावर परिणाम झाला आहे. त्‍यातच इंग्रजी शाळांनी पालकांची छळवणूक सुरू केली आहे. पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनदेतेवेळी गजानन मापारी आणि विजय मापारी उपस्‍थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: