क्राईम डायरीमुख्य बातम्या

बँकेतील सोने दुसर्‍यानेच सोडवले; दाम्पत्याची एसपींकडे धाव, चौकशीचे आदेश; बुलडाण्यातील खळबळजनक प्रकार

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आयसीआयसीआय बँकेत पती- पत्नीने गहाण ठेवलेले सोने दुसर्‍यानेच सोडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पळसखेड नाईक (ता. बुलडाणा) येथील अमोल डिगंबर राठोड आणि त्यांची पत्नी प्रिती अमोल राठोड यांनी केली आहे.
अमोल राठोड यांनी 24 जानेवारी 2018 रोजी सोने तारण ठेवून 2 लाख 8 हजार 907 रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच 4 एप्रिल 2019 रोजी सोने तारण ठेवून 3 लाख 32 हजार 322 रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांची पत्नी प्रिती राठोड यांनीही 2 लाख 5 हजार 684 रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले होते. कर्ज मंजुरीची सत्यप्रत अमोल राठोड यांच्याजवळ असताना कुणीतरी व्यक्तीने त्यांचे सोने सोडवून नेल्याचे आयसीआयसीआय बँकेकडून सांगण्यात आल्याने राठोड यांना धक्काच बसला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: