क्राईम डायरीमुख्य बातम्या

बकऱ्या चोरल्या; चिखली पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून शेतकरी दाम्‍पत्‍य पोलीस अधीक्षकांच्‍या दरबारी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भालगाव (ता. चिखली) येथील शेतकऱ्याच्‍या गोठ्यातून भरदिवसा २ बकऱ्या चोरांनी नेल्या. घटनेची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात द्यायला गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्‍यामुळे वृद्ध शेतकऱ्याने पत्नीसह आज, १८ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली.

शेतकरी आत्माराम नारायण धंदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या शेतातील टीनशेडमध्ये बकऱ्या बांधलेल्या होत्या. १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास गावातीलच अशोक भीमराव भगत यांनी त्या बकऱ्या सोडून नेल्या. शेतकऱ्याने याप्रकरणी गावातील तंटामुक्ती अध्यक्षांची भेट घेतली. त्यावेळी भगत यांनी तंटामुक्ती अध्यक्षांशी सुद्धा भांडण केले. मी बकऱ्या देत नाही, काय करायचे ते करून घे, असे धमकावले. या प्रकरणी शेतकरी शेतकरी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता त्‍यांचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही, अशी तक्रार शेतकऱ्याने केली आहे.

भादोल्‍यातही बकऱ्या, बोकूड नेले चोरून…
श्रावण महिन्यात बकऱ्या आणि बोकडांच्या किमती कमी असतात. मात्र श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात बकऱ्या व बोकडांना चांगली किंमत मिळते. हे गणित डोळ्यासमोर ठेऊन ग्रामीण भागात बोकड चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. भादोला (ता. बुलडाणा) येथील शेतकरी संदीप ठेंग यांच्या २ बकऱ्या व १ बोकड त्यांनी ओसरीत बांधल्या होत्या.आज, १८ ऑगस्‍टला सकाळी झोपेतून उठल्यावर बघितले असता त्यांना त्यांच्या बकऱ्या व बोकड दिसले नाहीत. परिसरात शोध घेऊनही मिळून न आल्याने त्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बकऱ्या चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: