क्राईम डायरीमुख्य बातम्या

बजाज फायनान्‍सच्या कर्मचाऱ्याऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल; कर्जदाराला शिविगाळ, बघून घेण्याची धमकी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः घेतलेल्या कर्जाचा केवळ 1 हफ्ता थकला म्हणून कर्जदाराला शिविगाळ व भेटल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश लक्ष्मण चौधरी (रा. शिवशंकरनगर, बुलडाणा) हे पुणे येथे एका कंपनीत काम करतात. मागच्या वर्षी  6 मार्च 2020 रोजी त्यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून मोबाइल खरेदीसाठी 61680 रुपयांचे कर्ज घेतले होते. तेव्हापासून त्यांनी कर्जाच्या हफ्त्याची नियमित फेड केली आहे. मात्र गेल्या महिन्यातला केवळ एक हफ्ता थकल्यावर त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून अर्वाच्‍च्‍य व अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात आली. काल, 8 एप्रिल रोजी त्यांना 9527150124 या क्रमांकावरून फोन आला व त्यांना आई-बहिणीवरून अश्लील शिविगाळ करण्यात आली. तेव्हा चौधरी यांनी 30 एप्रिल रोजी सर्व पैसे भरून कर्ज खाते क्लोज करतो, असे म्हटले असता आजच्या आज पैसे दिले नाहीत तर तुला बघून घेतो, अशी धमकी देण्यात आली. तशी तक्रार महेश चौधरी यांनी  आज सकाळी शहर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: