क्राईम डायरीमुख्य बातम्या

बलात्काराच्‍या तक्रारीची धमकी दिल्याने युवकाने घेतले विष!; दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल, मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३४ वर्षीय युवकाने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० जुलैला गुळभेली (ता. मोताळा) येथे घडली होती. या प्रकरणी मृतक युवकाच्‍या भावाने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, घरासमोर राहणाऱ्या कविता चव्हाण व तिच्या परिवाराने गोपालला बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच गोपालने आत्महत्या केल्याची तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी नंदू उमला चव्हाण, कविता नंदू चव्हाण, गणेश देवराव चव्हाण, बेबी गणेश चव्हाण सर्व (रा. गुळभेली, ता. मोताळा) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृतक गोपाल भीमराव चव्हाण याचा भाऊ राजेश भीमराव चव्हाण (३८) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या गुळभेली येथील घरासमोरच नंदू उमला चव्हाण हा त्याची पत्नी कविता नंदू चव्हाण हिच्‍यासह राहतो. या दोन्‍ही कुटुंबात सांडपाणी व रस्त्याच्‍या कारणावरून भांडण झाले होते. मात्र शेजाऱ्यांच्‍या मध्यस्थीमुळे पोलिसांपर्यंत प्रकरण गेले नव्‍हते. २९ जुलैला कविताने खरकटे पाणी गोपालच्‍या अंगणात टाकले. यावरून वाद झाला. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी नंदू व कविता शिविगाळ करू लागले. कविता व तिची बहीण बेबी गणेश चव्हाण या दोघी धमक्या देऊ लागल्या की तुझ्या विरुध्द बलात्काराचा रिपोर्ट देतो. त्‍यामुळे गोपाल घाबरून गेला.

दुसऱ्या दिवशी ३० जुलैला गोपाल शेतातून कामावरून घरी येत असताना त्याला कविता व बेबीने पुन्हा शिविगाळ केली. त्यानंतर गोपाल रागाने घरून निघून गेला. त्‍याने सव्वाचारच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी त्याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोपालची विनाकारण तक्रार केल्याने तसेच त्याला बलात्काराची केस करण्याची धमकी दिल्यानेच त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याच्या मृत्यूला नंदू उमला चव्हाण, त्याची पत्नी कविता, गणेश देवराव चव्हाण व बेबी गणेश चव्हाण हेच कारणीभूत आहेत. या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: