क्राईम डायरीमुख्य बातम्या

बसमधून महिलेचे लाख रुपयांचे दागिने लंपास; नांदुरा शहरातील खळबळजनक घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वायएस खासगी ट्रॅव्हल बसमधून एका महिलेचे 1 लाख 19 हजार 620 रुपयांचे दागिने चोरीला गेले. ही घटना आज 9 जानेवारीला सकाळी 11.30 ते 11.45 वाजेदरम्यान नांदुरा जुने बसस्थानक ते आशीर्वाद हॉटेलच्या दरम्यान घडली. या महिलेने नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून, बसचे कंडक्टर व नवीन बसस्थानकावर उतरलेल्या चार अनोळखी महिलांवर संशय व्यक्त केला आहे.

सौ. भाग्यश्री विशाल पेठकर (24, रा. इंदौर) ही आई- वडिलांना भेटण्यासाठी मलकापूर येथे जाण्यासाठी नांदूरा येथील जुन्या बसस्थानकावरून वाय एस खासगी बसने निघाली. आशीर्वाद हॉटेलजवळ बस आली असता तिने बॅगकडे पाहिले. तेव्हा बॅगमधील लाल रंगाच्या बॉक्समधील सोन्याचा नेकलेस, एक सोन्याची पट्टी पोथ व सोन्याची बेसर असे एकूण 1 लाख 19 हजार 620 रुपयांचे दागिने गायब होते. तिने बस कंडक्टर व नवीन बस स्थानकावर उतरलेल्या चार अनोळखी महिलांवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार अनोळखी महिला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: