बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बस्स आज एकच!; जिल्ह्यात फक्‍त चिखलीतच आढळला कोरोना रुग्‍ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 28 जुलैला एकच कोरोनाबाधित समोर आला असून, चिखली शहरातील डीपी रोड भागातील हा रुग्‍ण आहे. सध्या 23 रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवांलामध्ये रॅपीड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 634 तर रॅपिड टेस्टमधील 1870 अहवालांचा समावेश आहे.

23 रुग्‍णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 633762 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87247 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 23 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: