क्राईम डायरीमुख्य बातम्या

बस ओव्‍हरटेकच्‍या नादात ट्रकला धडकली, दोन्‍ही वाहनांच्‍या नुकसानीसह प्रवासी जखमी; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ओव्‍हरटेक करण्याच्‍या नादात एसटी बसने ट्रकला मागून धडक दिली. आपल्यासह बसमधील प्रवाशांच्‍या जखमी होण्यास बसचालकच कारणीभूत असल्याची तक्रार ट्रकचालकाने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आली आहे. त्‍यावरून पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना खामगाव तालुक्‍यातील अंत्रज फाट्याजवळ आज, 20 फेब्रुवारीला दुपारी दीडच्‍या सुमारास घडली.

शेख हनीफ शेख हमीद (38, रा. कालेखानीपुरा, बाळापूर, जि. अकोला ) हे ट्रक (क्रमांक एमएच 04 एल 6560) चिखलीवरून खामगावकडे सिमेंट खाली करून घेऊन येत होते. अंत्रज फाट्याजवळ मागून येणाऱ्या बसने (क्रमांक एम एच 40 वाय 5566) ओव्‍हरटेक करण्याच्‍या निष्काळजीपणे चालवून ट्रकला धडक दिली. यात ट्रकचे नुकसान झालेच, पण शेख हनीफ आणि बसमधील काही प्रवाशीही जखमी झाले. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्‍हा नोंदवला. तपास पोहेकाँ शेख हमीद करत आहेत. हा गुन्‍हा पोहेकॉ शिवाजी दळवी यांनी दाखल करून घेतला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: