क्राईम डायरीमुख्य बातम्या

बापलेकाला तिघांकडून बेदम मारहाण; पाळोदी येथील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतात पाणी शिरत असल्याचे सांगण्यासाठी गेलेल्या बापलेकाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना पाळोदी (ता. शेगाव) येथे काल, 12 एप्रिलला सकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली.

जवंजाळ आणि फुलकर यांचे शेत शेजारी शेजारी असून, विनोद फुलकर यांचे शेत खालच्या बाजूला तर ब्रह्मदेव जवंजाळ यांचे शेत वरच्या भागात आहे. जवंजाळ यांच्या शेतातील पाणी फुलकर यांच्या शेतात आले असता विनोद अर्जुन फुलकर (32, रा. पाळोदी) यांचा मुलगा हा त्‍यांना सांगण्यास गेला. तेव्‍हा आदित्य ब्रह्मदेव जवंजाळ याने त्याच्या तोंडावर बुक्का मारून लोटपोट करून खाली पाडले. मुलाच्या डोक्यात मागच्या बाजूला जमिनीवरील मुरुमाचा दगड लागून मुका मार लागला. यावेळी विनोद फुलकर समजावण्यासाठी गेले असता हरिभाऊ नामदेव जवंजाळ यांनी त्याला पकडले व ब्रह्मदेव ज्ञानदेव जवंजाळ याने हातातील काठीने डाव्या पायाच्या पोटरीवर मारहाण केली शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. विनोद अर्जुन फुलकर यांनी दिलेल्या शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आदित्‍य, हरिभाऊ व ब्रह्मदेवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्रीकृष्ण मोरे करीत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: