क्राईम डायरीमुख्य बातम्या

बावनबीरमधील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, चौघांना पकडले, दीडशे किलो मांस जप्‍त

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बावनबीर (ता. संग्रामपूर) येथे विनापरवाना सुरू असलेल्या कत्तलखान्यावर सोनाळा पोलिसांनी काल, ६ ऑगस्‍टला सायंकाळी छापा मारला. यावेळी चार जणांना मांस कापताना रंगेहात पकडण्यात आले. दीडशे किलो मांस जप्त केले असून, हे मांस कोणत्‍या प्राण्याचे आहे, हे तूर्त सांगण्यात आले नाही.

बावनबीर येथे विनापरवाना जनावरांची कत्तल होऊन मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुप्ते यांच्यासह त्यांच्या पथकाने बावनबीर परिसरात असलेल्या त्या कत्तलखान्यावर छापा मारला. यावेळी तिथे चार जण जनावरांची कत्तल व मांस विक्री करताना दिसले. शेख अयुब शेख सत्तार (२२), शेख इरफान शेख उस्मान (२४), शेख मुस्तफिर शेख सत्तार (२१), शेख शाहरुख शेख सादिक (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: