चंदेरी

बिपाशाआधी जॉन होता तिच्या प्रेमात!

अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री बिपाशा बासूचे प्रेमसंबंध बॉलीवूडमध्ये कधीकाळी खूप चर्चेत होते. तब्बल ९ वर्षे हे नातं टिकलं. मात्र नंतर दोघांत काय झाले माहीत नाही. पण एकाएकी ते नातं तुटलं. पण तुम्हाला माहिती नसेल की बिपाशाच्याही आधी जॉनच्या आयुष्यात एक अभिनेत्री होती. तिचं नाव रिया सेन. रिया सेनही अनेक चित्रपटांत दिसली आहे. ती मून मून सेन यांची मुलगी आहे.


जॉन आणि रियाची भेट ९० च्या दशकाच्या शेवटी झाली होती. त्यावेळी जॉन मॉडेलिंग करायचा. एवढा प्रसिद्धही नव्हता, तर रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. जॉन आणि रिया ओळखीनंतर लगेचच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते की दोघांनी लग्नाच्याही चर्चा सुरू केल्या. मात्र कालांतराने रियाला करिअरचे वेध लागले. बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याची जिद्द तिच्यात निर्माण झाली. यामुळेच तिने जॉनला लग्नासाठी नकार दिला. यातून वाद होऊन दोघे विभक्त झाले. जॉनने २००३ मध्ये पाप चित्रपटातून बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. नंतर जिस्म, धूम, दोस्ताना सारखे त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले. दुसरीकडे रियाचे करिअर मात्र पार रसातळाला गेले. तिचे सर्वच चित्रपट फ्लॉप गेले. नंतर तिने बंगाली चित्रपटात काम करून पाहिले. पण तिथेही तिला अपयशच पदरी पडले. नंतरच्या काळात जॉन बिपाशाच्या प्रेमात पडला. दोघांचे रिलेशन ९ वर्षे टिकले. नंतर बऱ्याच वर्षांनी जॉनने प्रिया रुनचाल आणि बिपाशाने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: