बुलडाणा (घाटावर)

बुलडाणावासियांनो, आता घरूनच सांगा ना तुमचा आजार; डॉक्टर फोनवर सांगतील औषधी!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः : भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सलटेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. नॅशनल टेलिकन्सलटेशन सर्व्हिसद्वारे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचारा बद्दल माहिती रुग्णालयात न जाता घरातल्या घरात मिळू शकते.

C-DAC या संस्थेकडून https://esanjeevaniopd.in हे पार्टल esanjeevaniopd मोबाईल वरील app विकसित करण्यात आले आहे. वरील वेबसाईट किंवा app उपयोग करून ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडिओ – व्हिडीओद्वारे सल्ला मसलत करून रुग्ण त्यांच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेऊ शकतात. रुग्णाच्या वेगवेगळ्या आजारावर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ईप्रेस्क्रिप्शन दिल्या जाते. सध्याच्या कोरोना साथीमध्ये ही सेवा खूप उपयोगाची ठरणार आहे. रुग्णाला रुग्णालयात न जाता घरच्या घरी त्यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. या सेवेसाठी डॉक्टर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोर्टल व अ‍ॅपवर उपलब्ध असतात.
ई संजीवनी ओपीडी ठळक वैशिष्ट्ये
रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, रांग व्यवस्थापन, डॉक्टरांशी ऑडिओ व्हिडीओ सल्लामसलत, ईप्रेस्क्रिप्शन, एमएमएस, ईमेल सूचना, राज्याच्या डॉक्टरांद्वारे विनामूल्य सेवा, शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे सदर सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: