बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाणा पालिकेने केली ‘नाकाबंदी’! 25 मुख्य चौकांत 44 बॅरिकेट्स!! 200 बांबूचा वापर; हे आहेत स्पॉट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या आदेशाने आज, 10 मे रोजी रात्री 8 वाजेपासून येत्या 20 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन सुरू झाला आहे. याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी बुलडाणा नगरपालिकेने शहरातील 25 मुख्य चौकांत बॅरिकेट्स लावण्याचे काम हाती घेतले आहे. आज रात्री उशिरापर्यंत ही नाकाबंदी पूर्णत्वास जाईल असा अंदाज आहे.

मलकापूर- चिखली या राज्य महामार्गावरील त्रिशरण चौक एका बाजूने बंद करण्यात आला आहे. यापुढे जाऊन सोसायटी पेट्रोल पंप, केशवनगर व चिंचोले चौक व धाड नाका चौकात बॅरिकेट्‌स लावण्यात येत आहेत. यापुढे जाऊन मलकापूर रोडवरील विशाल पान सेंटर व गणेश नगर चौकात  ही नाकाबंदी राहणार आहे.

तिथून ‘गुप्त मार्गे’ शहरात घुसण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या महाभागासाठी पालिकेमागील भीमनगर चौक, आठवडी बाजार चौक ते इकबाल चौकात देखील हा बंदोबस्त राहणार आहे. इकबालनगर, कोंडवाडा, जोहरनगर, तेलगूनगर, शिवनेरीनगर, सराफा बाजार, गवळीपुरा, क्रांतीनगर आदी परिसरासाठी जनता चौक, जैस्वाल चौक, कोर्ट चौकात  बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत. कारंजा चौकातून मुसंडी मारण्याचा प्रयत्‍न करणाऱ्यांसाठी गर्दे, भोंडे सरकार चौक येथे हा बंदोबस्त राहणार आहे. नवीन पॉश एरियातून येणाऱ्यांसाठी एडेड हायस्‍कूल चौक, तहसील, पंडित कानडे  उद्यान, एसबीआय चौक, ट्रेझरी दलाल चौक आणि वाय पॉईंट रायपूर रोड येथे बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत. सुमारे 200 बांबूचा वापर करून हे 44 बॅरिकेट्स लावण्याचे सुसज्ज नियोजन पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: