कोरोना अपडेट्स

बुलडाणा ब्रेकिंग!चाचण्या वाढल्या; वाढले पेशंट!; पॉझिटिव्हचा आकडा पावणे तिनशेच्या घरात!!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पुन्हा लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाल्यामुळे धाकधूक वाढलेल्या लाखो बुलडाणेकरांसाठी आजची सकाळ अशुभ व तितकीच धक्कादायक बातमी घेऊन उजाळली! आजच्या कोविड पॉझिटिव्हचा आकडा पावणे तिनशेच्या घरात पोहोचलाय. मागील काही दिवसांपासून शंभर सव्वाशेच्या आसपास रेंगाळणारा हा आकडा तब्बल 271 पर्यंत गेला आहे.
मागील आठवड्यात पॉझिटिव्हचा क्रमाक्रमाने वाढतच चालला आहे. 11 तारखेला 65, 12 तारखेला 79, 13 तारखेला 91, व्हॅलेन्टाईन डेला 110, 15 तारखेला 129, 17 तारखेला 199 तर 18 फेब्रुवारीला 134 असा वेग आहे. 16 तारखेला किंंचित दिलासा देणारा 82 चा आकडा आला. मात्र आज 19 फेब्रुवारीला हा आकडा डबल सेंच्युरी पार करून त्रिशतकाच्या घरात पोहोचला. यामुळे प्रशासन प्रामुख्याने आरोग्य यंत्रणा हादरल्या! काल परवा संचारबंदी आदी उपाय योजना करणाऱ्या जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारा हा आकडा आहे.
चाचण्यामुळे फुगला आकडा
दरम्यान चिंतन बैठकीत जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी चाचण्या वाढविण्याचे आदेश आरोग्य यंत्रणांना दिले होते. याचे तात्काळ पालन करण्यात आल्याने पॉझिटिव्हचा आकडा वाढल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यानुसार 1839 नमुन्यांपैकी 1781 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 1427 निगेटिव्ह तर 271 पॉझिटिव्ह आले. जास्त चाचण्या केल्याने बाधितांचा आकडा वाढल्याचे या सूत्रांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना सांगितले. मात्र पॉझिटिव्हीटी रेट 15.21 टक्के इतका आहे. हा दर मागील 4 दिवसांत कमी झाला आहे. यामुळे टेस्ट वाढविल्याने बाधित संख्या जास्त येणार असले तर पॉझिटिव्हीटी रेट कमी होणार आहे, ही दिलासादायक बाब असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: