क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाणा शहरातून दोन तरुणी बेपत्ता; एकीचे वय 18 तर दुसरीचे 19 !

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराच्‍या दोन  वेगवेगळ्या भागांतून 2 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. मुलींच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात त्‍या हरवल्याची तक्रार दिली आहे. एकीचे वय 18 तर दुसरीचे वय 19 वर्षे आहे.

शहरातील सागवन ,गायरान परिसरात राहणारी वृषाली गजानन डोंगरदिवे(18) बेपत्ता झाली. 29 मार्च रोजी दुपारी 3:30 वाजता दुकानात जाते म्हणून ती घराबाहेर पडली होती. मात्र घरी न परतल्याने आजपर्यंत शोध घेऊनही ती सापडली नसल्याने आज पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली.

दुसऱ्या घटनेत वीर लहुजी नगरातील राधा दगडू कांबळे ही 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. 30 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजता घरी कुणी नसताना ती घराबाहेर निघून गेली होती.तेव्हापासून आजपर्यंत ती परतली नाही. याप्रकरणी मुलीच्या आजीने पोलीस ठाण्यात येऊन नात हरवल्याची तक्रार दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: