क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाण्याच्या बसस्‍थानकावरून प्रवासी महिलेची बॅग चोरणारे दोघे गळाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा बसस्थानकावरून एका प्रवासी महिलेची बॅग लुटल्याची घटना ११ एप्रिलला घडली होती. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे बुलडाणा शहर पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना काल, १७ ऑगस्‍टला अटक केली. आज, १८ ऑगस्‍टला न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जनुना (ता. बुलडाणा) येथील दुर्गा मधुकर सरदार यांची बॅग चोरट्यांनी लांबवली होती. बॅगमध्ये २० हजार रुपये रोख व एक मोबाइल होता. याप्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी चोरटे निष्पन्न केले. त्यांना बुलडाण्यातूनच अटक करण्यात आली. दोन्ही चोरटे हरियाणा राज्यातील असून, ते कामासाठी बुलडाण्यात आले होते. सुनील जयवीर आणि अनिलकुमार नफेसिंग अशी चोरट्यांची नावे आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: