क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाण्याच्‍या इंदिरानगरात जुगार अड्ड्यावर छापा!; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शहरातील इंदिरानगरात स्‍थानिक गुन्‍हे शाखेने छापा मारून 5 जुगाऱ्यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई काल, 29 एप्रिलच्‍या रात्री साडेदहाच्‍या सुमारास करण्यात आली.

शेख निसार शेख हबीब (51, रा. जोहरनगर, बुलडाणा), राजू भीमराव कोल्हे (48, रा.मच्‍छी ले आऊट, बुलडाणा), स्‍वप्नील गजानन पोपळघाट (23, रा. इंदिरानगर, बुलडाणा), संदीप सुपडा आसाबे (20, रा. इंदिरानगर, बुलडाणा), शुभम नारायण वानखेडे (20, रा. इंदिरानगर, बुलडाणा) अशी पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्‍थानिक गुन्‍हेने इंदिरानगरात छापा मारला. या ठिकाणी एक्का बादशहा नावाचा जुगार खेळ पैशाच्‍या हारजीतवर खेळला जात होता. जुगाऱ्यांना पकडून शहर पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले.  त्‍यांच्‍याकडून नगदी 33050 रुपये व 2 मोटारसायकली (किंमत 1 लाख रुपये) जप्‍त करण्यात आल्या.  ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्‍या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, एपीसी दीपक पवार, पोकाँ दीपक वायाळ, पोकाँ युवराज शिंदे, पोकाँ गणेश शेळके, पोकाँ गजानन गोरले, पोकाँ वैभव मगर, पोकाँ सुभाष वाघमारे यांनी केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: