क्राईम डायरी

बुलडाण्याच्‍या गायत्री एजन्‍सीमध्ये खाद्यतेलावर डल्ला मारणारे चौघे ताब्‍यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः श्याम टॉकिजसमोरील गायत्री एजन्‍सीमधून 5 हजार रुपये किंमतीचे सूर्यफुल तेलाचे 24 पाऊच चोरून नेल्याची घटना 5 एप्रिलला समोर आली होती. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसांनी काल, 14 एप्रिलला चौघांना ताब्‍यात घेतले असून, यात 2 मुलांचा समावेश आहे. एजन्‍सीचे मालक सुभाष खेतान (रा. चैतन्यवाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून योगेश राजेश्वर गायकवाड व गणेश देशमुख यांच्‍यासह दोन मुलांचा ताब्‍यात घेतले आहेत. त्‍यांची चौकशी केली जात आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: