क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाण्यातून अकोल्याला हलवताना गर्भवतीचा बाळासह वाटेतच मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रसुतीसाठी बुलडाणा जिल्हा रुग्णालयातून अकोला येथे हलवताना गर्भवतीचा बाळासह वाटेतच मृत्यू झाला. ही घटना आज, २६ जुलै रोजी घडली.

मोताळा तालुक्यातील उबाळखेड येथील सौ. अनिता संतोष भेंडे (२८) हिला प्रसुतीसाठी काल रात्री बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची तब्येत खराब असल्याने प्रसुती होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी महिलेला अकोला येथे हलविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आज रुग्णवाहिकेने अकोल्याकडे जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्‍यानंतर मृतदेह पुन्‍हा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणून उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: