क्राईम डायरीबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाण्यात आमदार गायकवाड- शिंदे गटात राडा; स्‍टंटबाजी करणाऱ्या शिंदेंना शिवसैनिकांचा चोप!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाच्‍या वरिष्ठ नेत्‍यांवर खालच्या भाषेत केलेली टीकेचा निषेध करण्यासाठी थेट आ. गायकवाडांचे कार्यालय गाठणाऱ्या भाजपाच्‍या विजयराज शिंदेंना ही स्‍टंटबाजी चांगलीच भोवली. यातून कायदा सुव्यवस्‍था निर्माण झाली. कार्यालयासमोरच वडिलांचा पुतळा जाळला जात असल्याचे पाहून संतापलेल्या आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी धावून येत अडवले. यावेळी दोन्‍हीकडील कार्यकर्त्यांत राडा झाला. कुणाल गायकवाड व शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपाच्‍या नेत्‍यांनी केला आहे. दोन्‍ही गटांकडून पोलिसांत परस्‍पविरोधी तक्रार दाखल होण्याची शक्‍यता आहे. शहरातील जयस्तंभ चौकस्‍थित आमदार गायकवाडांच्‍या कार्यालयाजवळ हा प्रकार आज, 18 एप्रिलला दुपारी 4 च्‍या सुमारास घडला.

जयस्तंभ चौकातील राड्यानंतर शिवसैनिकांनी आमदार गायकवाड यांच्‍यावर टीका करणाऱ्या माजीमंत्री संजय कुटे यांचा पुतळा जाळला.

कोरोना संकटाशी महाराष्ट्र सामना करत असताना भाजपाचे वरिष्ठ नेते मात्र राजकारण करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप करून भडव्या, चंम्‍प्‍या म्‍हणत आमदार गायकवाडांनी भाजपा नेत्यांचा उद्धार केला होता. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे विजयराज शिंदे व योगेंद्र गोडे यांच्यासह काही कार्यकर्ते जयस्तंभ चौकातील आमदार गायकवाडांच्‍या कार्यालयाजवळ जमले. आमदार संजय गायकवाड यांच्या अटकेची मागणी ते करत होते. त्याचवेळी संजय गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचेही नियोजन भाजप नेत्यांनी केले होते. त्यानुसार पुतळा जाळण्यासाठी आणला असता हा सर्व प्रकार कार्यालयातून पाहणारे आमदारपूत्र  कुणाल गायकवाड यांचा संताप अनावर झाला. ते कार्यालयातून धावतच जयस्तंभ चौकात आले. त्यांनी पुतळा ताब्यात घेतला. यावेळी भाजपाच्या नेत्यांसोबत वाद होत असल्याचे पाहून शिवसेनेचे  अन्य कार्यकर्तेही धावून आले. यावेळी भाजपाच्या झेंड्यांची मोडतोड व काही भाजपाच्या नेत्यांचे  मोबाईल सुद्धा फोडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्टंटबाजी करण्याऱ्या विजयराज शिंदे यांना मारहाण सुद्धा करण्यात आली. यावेळी दोन्हीकडील काही समंजस कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने सोडवणूक करण्यात आली. घटनेनंतर विजयराज शिंदे यांच्यासह भाजपाच्‍या नेत्यांनी पोलीस स्टेशन गाठले. विजयराज शिंदे उपचार घेण्यासाठी दवाखान्यात  दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही वेळातच आमदार कुणाल गायकवाड हे सुद्धा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. विजयराज शिंदे आणि कुणाल गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. संध्याकाळी सहापर्यंत याप्रकरणी दोन्‍ही गटाकडून तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.  आमदार गायकवाड यांच्या विधानाचे पडसाद चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद येथेही उमटले असून, तिथेही आमदार गायकवाड यांचे पुतळे जाळण्यात आले. हा प्रकार शिवसेना कार्यकर्त्यांना माहित झाल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा जयस्तंभ चौकात आंदोलन करत संजय कुटे यांचा पुतळा जाळण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

संजय कुटे XXXXXX : संजय गायकवाडांनी पुन्‍हा साधले शरसंधान… तुम्हीच पहा काय टीका केली…

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: