क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाण्यात ऑनलाइन जुगारावर छापा, दोघे ताब्‍यात, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील वृंदावननगरात भाड्याच्‍या खोलीत सुरू असलेल्या ऑनलाइन जुगारावर शहर पोलिसांनी छापा मारून दोघांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई १९ जूनच्‍या सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास करण्यात आली.

उमेश अंबादास देशमुख (रा. हाजी मलंग दर्गा परिसर, बुलडाणा) व आकाश चाफेकर (रा. चांडक ले आऊट, बुलडाणा) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांनी वृंदावनगरात भाड्याने खोली घेऊन तिथून ऑनलाइन जुगार धंदा सुरू केला होता. त्‍यांच्‍याकडून लॅपटॉप, कॉम्‍प्‍युटरसह १ लाख २७ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. पोलीस निरिक्षक प्रदीप साळुंखे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व एपीआय अभिजीत आहिरराव, हेड कॉन्‍स्‍टेबल माधव पेठकर, अमोल खराटे यांनी केली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: