कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाण्यात कोरोनाचा 192 वा बळी!; मलकापुरात सर्वाधिक 46 बाधित, खामगाव, चिखली, बुलडाणा हॉटस्‍पॉट कायम!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 25 फेब्रुवारीला कोरोनाने 192 वा बळी घेतला आहे. उपचारादरम्यान गोपाल आश्रम, बुलडाणा येथील 75 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात 308 बाधितांची भर पडली असून, 134 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला. दरम्‍यान, मलकापुरात सर्वाधिक 46 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळल्‍याने यंत्रणा काळजीत पडली असून, कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर तिथे उपाययोजना सुरू केल्या आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2753 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2434 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 308 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 242 व रॅपीड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1188 तर रॅपिड टेस्टमधील 1246 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

मलकापूर शहर : 46, मलकापूर तालुका : तांदुळवाडी 2, तालसवाडा 1, चिखली शहर : 34, चिखली तालुका : चांधई 1, पळसखेड 1, अंचरवाडी 1, शेलगाव आटोळ 1, पळसखेड दौलत 1,अमोना 1, भोकर 2, डोंगर शेवली 2, मुरादूपर 1, शिंदी हराळी 3, सावरगाव डुकरे 2, तेल्हारा 1,मंगरूळ नवघरे 1, आमखेड 1, खैरव 1, शेलूद 2, शिरपूर 2, वळती 1, माळशेंबा 1, कोलारा 3, टाकरखेड हेलगा 1, दहिगाव 1, मेहकर शहर : 3, मेहकर तालुका : डोणगाव 1, सावत्रा 3, हिवरा आश्रम 1, शेंदला 1, जानेफळ 1, बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : माळविहीर 1, हतेडी 1, डोंगरखंडाळा 1, सागवन 6, अजिसपूर 1, नांदुरा शहर : 1, खामगाव शहर : 41, खामगाव तालुका : शेलोडी 1, घाटपुरी 3, शेगाव शहर : 1, जळगाव जामोद शहर : 2, जळगाव जामोद तालुका : झाडेगाव 1, आसलगाव 11, पिंपळगाव काळे 1, सुलज 1, देऊळगाव राजा तालुका : वाघोरी वडगाव 1,वाकी 2, डोढ्रा 2, देऊळगाव मही 4, सावंगी टेकाळे 2, सिनगाव जहागीर 6, आळंद 3, चिंचोली बुरुकुल 2, देऊळगाव राजा शहर : 14, सिंदखेड राजा शहर : 8, सिंदखेड राजा तालुका : सवडत 1, पिंपळखुटा 2, वाघोरा 3, राहेरी 1, सावरगाव माळ 1, शेंदुर्जन 1, लोणार तालुका : वेणी 3, मोताळा तालुका : बोराखेडी 3, पिंपळगाव देवी 1, तळणी 1, सारोळा मारोती 1, खरबडी 1, उऱ्हा 1, वरूड 3, मूळ पत्ता नागपूर 1, पिंपरखेड ता. तेल्हारा जि. अकोला 1, भंडारा 1, अकोला 1, सांजोळ ता. जाफराबाद जि. जालना 1, बीड 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 308 रुग्ण आढळले आहेत.

134 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 134 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 39, देऊळगाव राजा : 12, चिखली : 40, मलकापूर : 14, शेगाव : 19, लोणार : 4, सिंदखेड राजा : 1, जळगाव जामोद : 4, मोताळा : 1.

2317 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 127372 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 15079 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 7131 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 17588 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2317 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 192 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: